
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
यवतमाळ – ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिव पदी प्रा.जयश्रीताई साळुंके यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या जळगांव जिल्ह्यात रुक्मिणीताई कला व वाणिज्य महाविद्यालय अमळनेर येथे इतिहास विभाग प्रमुख आहेत.
ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड.प्रमोदभाऊ घोडाम यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे.
प्रा.जयश्रीताई साळुंके यांना अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली चा सावित्रीबाई फुले फेलोशिप अवार्ड,खान्देश जनसेवा फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय नारीदीप सन्मान, फाँरएव्हर स्टार इंडिया अवाँर्ड जयपूर राजस्थान तर्फे नँशनल द रिअल सुपर वूमन अँवार्ड,वीर राणी झलकारी शौर्य महीला पुरस्कार यासह आणखी विविध १२ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.तर नुकत्याच कोरोना महामारीच्या काळात जनसेवेबद्दल कोरोना योद्धा म्हणून विविध ३१ पुरस्कारानेही सन्मानित आहे.
आंदोलने,मोर्चे,उपोषण या माध्यमातून आदिवासी आणि इतर समाजाचे प्रश्न विशेषतः महीलांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय विद्यापीठ स्तरीय चर्चा सत्रे,परिषद,अधिवेशन यातून शोधनिबंध ही सादर केलेले आहे.
अष्टपैलू व्यक्तीमत्वाची नियुक्ती ट्रायबल वुमेन्स फोरमच्या राज्य महासचिव पदी झाल्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
