दोन कडक लाॅकडाऊन मुळे खाजगी बस मालक आले चांगले च आर्थिक अडचणी त

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

●देऊळ बंद शैक्षणिक संस्था बंद चा मोठा फटका●सर्व खर्च भागविता भागविता नाकी नऊ आले●प्रशासकीय यंत्रणे चे अक्षम्य दुर्लक्ष चं●
कोरोणा महामारी च्या काळात सतत दोन वर्षात दोन वेळा ऐन हंगामात लाॅकडाऊन करण्यात आल्याने,खाजगी बस मालक म्हणजे (ट़्रॅव्हल्स ए.सी.,नान ए.सी.)सर्व भारत भ्रमण नागरिकांना विविध प्रेक्षणीय स्थळे,धार्मिक स्थळे,यथायोग्य दरात सुखरुप परत आणणारे सर्व बंद च असल्याने खूपच आर्थिक अडचणी त आले आहे. पण मात्र यांना वीमा,वाहन कर,इतर सर्व प्रकारचा कर माफ करण्यात येईल असे प्रशासनाने सांगितले होते. पण मागील वर्षी विम्याची मुदत वाढवून दिली या व्यतिरिक्त काहीच मदत केली नाही. या वर्षी तर विम्याची मुदत वाढवून मिळेल की नाही याची मात्र शास्वती खाजगी बस मालकांना अजिबात नाही. राळेगांव तालुक्यात पंचवीस च्या वर खाजगी बसेस आहेत. लग्न सराई चा हंगाम अतिमहत्वांचा,आणि इतर वेळी भारत भ्रमण,महाराष्ट्र दर्शन,शाळा सहली सह इतर कार्यक्रमात खाजगी बस चा उपयोग हमखास होत असतो.
पण दोन वर्षात खाजगी बस जागची हललीच नाही.चक्काजाम मुळे आर्थिक अडचणी त खाजगी बस मालक आले आहेत.
मध्यत॔री अर्धे सुरु अर्धे व्यवसाय बंद असाच विषय दोन वर्षात आढळून आले आहे. 
खाजगी बस मालकांना संपूर्ण वर्षभर देऊळ चोवीस तास उघडे राहीले तर त्याचा खूप मोठा फायदा व्यवसाय वाढीसाठी होतो.विशेष म्हणजे या दोन महत्त्वाच्या लाॅकडाऊन मध्ये देऊळ आणि शैक्षणिक संस्था च सदासर्व वेळ बंद चा मोठा आर्थिक फटका या दळणवळणाच्या व्यवसायास बसला आहे. बहुतांश बस मालकांनी चालक क्लिनर यांना कामावर ठेवले. अर्धे वेतन देऊन त्यांचा ही संसाराचा गाडा ओढण्याचा कसातरी प्रयत्न करत आहे. तरी प्रशासनाने या चालकांना आर्थिक सहकार्य करावे