
राळेगाव तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत अंतर्गत मौजा रोहिणी येथे अंगणवाडीच्या इमारतीचा २६ जून रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला.सदर
रोहणी येथे जागेची समस्या उद्भवली असता.श्री विनायक मा. जवादे यांनी स्व.श्रीमती शांताबाई जवादे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जागा उपलब्ध करून दिली व गावात अंगणवाडी सुरु झाली. हा एक अतिशय आनंदी क्षण होता. उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सरपंच श्री. रामदासजी जवादे ,माजी सभापती श्यामकांत येनोरकर,श्री.सुधीरजी खोडगडे सचिव गजानन भोयर तसेच लौकिक महाराष्ट्र वार्ताहर श्री.रामभाऊ भोयर व पोलीस पाटील अतुल जवादे उपस्थित होते. अन्य उपस्थिती मंध्ये गावातील सन्माननीय सदस्य अशोक ठाकरे, अरुण पन्नासे व अन्य नागरिक अंगणवाडी सेविका व बालकवर्ग उपस्थित होते प्रमुख पाहुणे श्री.विनायक मारोती जवादे यांनी अंगणवाडी सुरु होणे हि खूप मोठी उपलब्धी आहे. गावकऱ्यांनी या कार्याला हातभार लावावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ.गायत्री विनायक जवादे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
