
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राज्य सरकार ज्या योजना राबवितात त्या योजना कृषी विभाग व महसूल विभागानी शेतकऱ्यांच्या गावात जाऊन समजावून सांगाव्या . प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तालुक्यात किती गांवा मंध्ये राबविली किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला . याच बरोबर येणाऱ्या खरीप पिकाचा आढावा दिं १३ एप्रिल २०२२ बुधवारला तालुका कृषी कार्यालयात आमदार प्रा.डॉ अशोकराव उईके यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला . आढावा बैठकीला तहसीलदार रवींद्रजी कुमार कानडजे तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी गटविकास अधिकारी मडावी जि.प. सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे प.स. सभापती प्रशांतभाऊ तायडे ' डॉ. कुणालभाऊ भोयर कृषी विभागातील कर्मचारी उपस्थीत होते . तालुक्यातील २००८ - ०९ या वर्षातील शेतकरी अद्याप ही कर्जापासून वंचीत आहे. या बाबत शासनाचे काही निर्देश आले का तुमच्या स्तरावरून कार्यवाही करावी . शेतक-यांना पिक विमा काढण्यासाठी आग्रह धरावा त्याचे फायदे त्यांना समजावून सांगावे . नियमीत कर्जाची रक्कम भरणा करणा-या शेतक-यांना महाराष्ट्रातील आघाडी सरकार ५० हजार प्रोत्साहन देणार असे जाहीर केले होते . ते शेतकरी वर्गाच्या खात्यात जमा झाले का या बाबत उपस्थीत अधिका-याना विचारणा केली यावर अद्याप एकालाही लाभ मिळाला नाही असे उत्तर आले . वयोश्री योजना , किसान सन्मान योजना प्रधानमंत्री गरीब कल्यान कारी योजना प्रधान मंत्री श्रमयोगी योजना , जल जिवन मिशन योजना ग्रामीन भागात घर घर मे नळ ईश्रम योजना या योजनांची माहिती घेण्यात आली . प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या सद्य स्थिती ची माहीती घेण्यात आली व कृषी विभागाने जबाबदारीने काम करावे . प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करने सर्वांचे कर्तव्य आहे असे सांगितले . याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने पिक विमा काढणे का गरजेचे आहे यासंदर्भात त्यांना माहिती देणे त्याचा प्रचार करणे गरजेचे आहे . मान्सून पूर्व खरीप पिकांच्या संदर्भात शेतकऱ्यांना कृषी विभाग काय माहिती देणार कोणते वाण लावलं पाहिजे शेती मध्ये काय बदल केले पाहिजे शेतकऱ्यांनी शेती करताना पिकांची कोणती काळजी घेतली पाहिजे यासंदर्भात कृषी विभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या गावात महसूल कर्मचार्यांच्या मदतीने गावागावांमध्ये जाऊन माहिती देणे आवश्यक आहे . शेतकऱ्यांना शेती मध्ये होत असलेले बदल हवामान याची माहीती देण्यात यावी आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या संदर्भात आमदार प्रा डॉ. अशोकराव उईके यांनी सुचना व मार्गदर्शन केले.
