
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगांव नगरपंचायच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर दिं २१ फेब्रुवारी २०२२ रोज सोमवारला स्वीकृत सदस्य व विषय समिती सभापतींची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सभागृहात काँग्रेसचे पूर्ण बहुमत असतांना बांधकाम सभापती पद शिवसेनेला देण्यात आले महाविकास आघाडीचा धर्म काँग्रेसने राळेगाव येथे पाळला काँग्रेसचे ११ नगरसेवक व ३ अपक्ष नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ चौदा झाले त्यामुळे काँग्रेसचेच दोनही स्वीकृत सदस्य झाले.
त्यामध्ये नंदकुमारभाऊ गांधी व मधुकरभाऊ राजूरकर यांचा समावेश आहे तर पाणीपुरवठा व जलसंधारण समिती सभापतीपदी उपाध्यक्ष जानरावभाऊ गिरी प्रतिष्ठेच्या बांधकाम सभापती पदी शिवसेनेचे संतोषभाऊ कोकुलवार शिक्षण आरोग्य आणि स्वच्छता समिती सभापती पदी पुंडलिक कांबळे तर महिला व बालकल्याण सभापतीपदी मोहिनीताई बोबडे यांची निवड करण्यात आली सगळे सभापती अविरोध निवडून आले.
