मुसळधार पावसात घर पडले,चंद्रमौळी झोपडीतील इंदुबाई ला हवा घरकुलाचा आधार

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यातील चिखली येथील फाटक्या चंद्रमौळी झोपडीत राहणारी इंदुबाई गुलाब सावरकर ही विधवा महिला प्रशासनाच्या निष्ठुरतेची बळी ठरली आहे.
दहा ते बारा वर्षापासून ती घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे.गरजवंतांच्या पहिल्या श्रेणीसाठी पात्र असतानाही तिला ग्रामपंचायत स्तरावर घरकुलाचा लाभ देण्यात आलेला नाही सन २०११-१२ मध्ये झालेल्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणातही तिच्यावर अन्याय झाला ती चंद्रमौळी झोपडीत असतानाही घरकुल यादीत तिचे नाव नाही प्रशासनाच्या या उदासीन तेचा फटका तिला आज सहन करावा लागला चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या इंदुबाई चे घर एका बाजूला टीना तर दुसऱ्या बाजूला मातीचा लेप लावलेल्या कुडात ती राहत असे मात्र आलेल्या अति मुसळधार पावसामुळे असलेल्या मातीच्या कुडाचे घर पडले पडलेल्या घरामुळे तिच्या घरातील असलेले पोटापूरते अन्नधान्य व कपडे ओले चिंब झाले इंदूबाईने अशा मोडक्या झोपडीत दिवस काढले अखेर मात्र पावसाने झोपडी तुटून पडली इंदुबाई विचारात पडली आता राहायचे कसे जगायचे कसे असा प्रश्न तिला पडला.
इंदूबाई चे पती हे खात काम करीत होते ते आठ-दहा वर्षांपूर्वी इंदूबाईचे पती बिमारीने मृत्यू पावले तिला असलेले दोन मुले व दोन मुली मुलामुलीचे लग्न झाले मुली आपआपल्या घरी गेली मुलेही तीला सोडून बाहेर गावी गेली त्यामुळे इंदूबाईला सध्या आधार कुणाचाच नाही अशी इंदूबाईची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. काठ्यांचा आधार घेऊन प्लास्टिकच्या फाटक्या कागदात दिवस काढीत आहे दोन घास खाण्याचे वांदे इंदूबाईचे आहे. तिला शासनाचा श्रावणबाळ योजनेचा १००० रुपयांचा आधार व तिला मिळत असलेल्या स्वस्त धान्य ती या शासनाच्या मिळालेल्या पैशावर व राशनवर आपल्या जीवन जगत आहे. मात्र घर बांधण्याचे आर्थिक बळ तिच्याकडे नाही मरणाच्या अगोदरच हक्काचे घर असावे अशी इच्छा तिची असतानी असलेली चंद्रमौळीची झोपडीही निसर्गाने हीरवली दहा वर्षापासून इंदुबाई पडक्या झोपडीत राहत असताना तिने ग्रामपंचायतीकडे घरकुल द्या अशी मागणी केली मात्र ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आलेली नाही. शेवटी पावसाने इंदूबाईची झोपडी पडली अन इंदूबाईला ग्रामपंचायतिच्या पुढाकाराने पदाधिकारी व गावकऱ्यांच्या मदतीने इंदूबाईला तात्पुरती राहण्याची व्यवस्था करून दिली .

चंद्रमौळी झोपडीतून इंदुबाई चे नाव घरकुलासाठी पात्र असलेल्या यादीत नसल्यामुळे तिला घरकुल देता येत नाही असे ग्रामपंचायत पदाधिकारी सांगतात परंतु पंचायत समिती वरिष्ठ स्तरावर मागणी लावून धरण्याचे सौजन्य त्यांनी एकदाही दाखविले नाही त्यामुळे इंदुबाईला घरकुला पासून मुकावे लागले

इंदूबाईची चंद्रमौळी झोपडी पावसाने हिरावल्याने तिला ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या पुढाकाराने तिला राहण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी तात्पुरता निवारा दिला असला तरी निराधार असलेल्या इंदुबाई सावरकर या विधवा महिलेचे नाव घरकुलाच्या ब यादीत किंवा ड यादीत नसले तरी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजी मुळेच इंदुबाई चे नुकसान झाले असून इंदुबाई ला घरकुलाचा आधार अवश्यक आहे त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन इंदुबाईला घरकुल मिळवून देण्याची नितांत गरज झाली आहे