
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील कला, वाणिज्य महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. सुरेश फुलकर यांना नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
त्यांचा संशोधन प्रबंधाचा विषय “रोल ऑफ पब्लिक लायब्रेरिज इन एनन्हान्सिंग सोसियल व्हॅल्यूज, सोसिओ-कल्चरल डेव्हलपमेंट अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट ऑफ अमरावती डिव्हिजन इन महाराष्ट्र स्टेट” असा असून, सार्वजनिक ग्रंथालये समाजमूल्यांची जपणूक, सामाजिक-सांस्कृतिक विकास व समुदाय विकासात कशी महत्त्वाची भूमिका बजावतात यावर त्यांनी सखोल व अभ्यासपूर्ण संशोधन केले आहे. हा विषय समाजोपयोगी व वर्तमान काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
आपल्या यशाचे श्रेय श्री. सुरेश फुलकर यांनी आपले पीएच.डी. मार्गदर्शक डॉ. किशोर मांडगावकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब दायदार, सचिव श्री. बापूसाहेब भोयर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर सावरकर यांना दिले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीवर्गाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
