
सहसंपादक: रामभाऊ भोयर
नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा निर्धार आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी आज राळेगाव शहराला भेट देत स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. राळेगाव नगरपंचायत कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राळेगावसाठी मंजूर झालेल्या नव्या पाणी पुरवठा योजनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
“राळेगावसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या योजनेमुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होईल आणि नागरिकांना शुद्ध पाणी सहज उपलब्ध होईल,” असे त्यांनी सांगितले.
तसेच उईके यांनी स्पष्ट केले की, ही योजना जनतेच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन राबवली जात असून शासनाकडून यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे.यावेळी शहरात होत असलेल्या वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आरोग्य विषयक समस्या याबाबत माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
अधिकृत घोषणेमुळे राळेगाव परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
