
आनंदवन, वरोरा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समिती द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा च्या अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाअतंर्गत शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाचे प्रशिक्षण दिले. अझोला ही एक वनस्पती आहे. याचा पाला दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त आहे. अझोला जलशैवाळासारखे दिसणारे तरंगते नेचे वर्गीय वनस्पती आहे. पशुपालनासाठी अझोला हे पीक महत्त्वाचे आहे, पशुपालन व दुग्धव्यवसाय हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहेत. नत्र स्थिरीकरणाऱ्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणूनही याचा वापर होतो, पण नत्राबरोबरच या वनस्पतीत प्रथिने, जीवनसत्त्वे (अ आणि ब ) असेच सारतत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. अझोला मुळे दुग्ध उत्पादनात 15-20 टक्क्यांनी वाढ होते. अझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून त्या तुलनेत अझोला उत्पादन अधिक आहे. ही सेंद्रिय व नैसर्गिक वनस्पती आहे, त्यामुळे जनावरांच्या शरीरावर , विपरीत परिणाम होत नाही. कमी जागेत उत्पादन घेता येते व प्रकल्प सुरू करायला लागणारी गुंतवणूकही कमी आहे.
कु. नुपुर बिसेन, कु. ईशा ढोक, कु. अदिती दीक्षीत, कु. तन्वी देशमुख, कु. मोनाली गावंडे, कु. रिया गेडाम, कु. रुषाली पवार आणि कु. तेजस बोरकर या विद्यार्थीनींचा यामध्ये समावेश होता. यासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार सर, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वी. महाजन सर विषय विशेतज्ञ डॉ. पी. एन. राखोंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले.
