राळेगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून गायक कलावंत अशोक कोल्हे सन्मानित

सहसंपादक : रामभाऊ भोयर

कलावंताच्या कलेला प्रोत्साहित करण्याच्या शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे धोरणानुसार कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव सभागृहात खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते व नगराध्यक्ष रवी शेराम अरविंद वाढोनकर शिवसेना संपर्कप्रमुख दिगंबर मस्के तालुकाप्रमुख विनोद काकडे राजू तेलंगे यांचे प्रमुख उपस्थितीत गायक कलावंत अशोक कोल्हे यांना शाल व श्रीफळ देऊन तर पत्नी अंजू अशोक कोल्हे हिला साडी सोळी देऊन सन्मानित करण्यात आले अशोक कोल्हे हे आर्थिक परिस्थिती साधारण असतानाही त्यांच्यामध्ये असलेल्या गायन कलेच्या छंदापाई कलाविष्कार संस्थेच्या माध्यमातून गायनाचे कार्यक्रम करीत असतात शिवसेना कार्यकर्ते शंकर गायधने यांच्या प्रयत्नातून घडवून आणलेल्या या गौरव कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख इम्रान पठाण विभाग प्रमुख प्रशांत वारेकर विजय पाटील सुरेंद्र भटकर महिला आघाडीच्या प्रमुख पार्वता मुखरे दीपक येवले कापसे रोशन उताणे सुनील क्षीरसागर नाना कोल्हे प्रभाकर भगत संजय मानकर सहित शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते