


सहसंपादक:- रामभाऊ भोयर
राळेगाव प.स.अंतर्गत येत असलेल्या पौर्णिमा माध्यमिक शाळा सावनेर ता. राळेगाव जि. यवतमाळ शाळेने दरवर्षी प्रमाणे या वर्षी निकालाची उत्कृष्ठ पंरपरा कायम राखली.मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.शाळांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ९५% लागला असून ०९ विध्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर २२ विध्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. परिक्षेला बसलेल्या एकूण ४१ विद्यार्थ्यांमधून ३८ विध्यार्थी उत्तीर्ण झाले.यात कु.प्रतीक्षा विलास खंडाळकर प्रथम क्रमांक(८६%) कु.श्रद्धा निलेश आत्राम दुसरा क्रमांक( ८१.८०%) कु. सानिया शंकर पंधरे तिसरा क्रमांक(८०.६०%) प्रेमकुमार अतुल हिवरकर चौथा क्रमांक(७९.६०%) अभिषेक भारत बोबडे पाचवा क्रमांक(७८.६०%) याने प्राप्त केले.शाळेत चालवलेले मोफत अतिरिक्त शिकवणी वर्ग तसेच योग्य अभ्यासपूरक राबविलेले उपक्रम यामुळे हे शक्य झाले आहे.यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले.शाळेच्या यशाचे संस्थेच्या वतीने श्री.ॲड प्रफुल्लभाऊ मानकर व सौ.राधिकाताई मानकर यांनी कौतुक केले.वरील यशासाठी मुख्याध्यापक श्री. डी.आर.भोयर स. शिक्षक श्री.जी.डी.टाले, श्री.एम.जी.तेलंग, कु.डी.एस.दिघडे, श्री. ए.आर.भोयर, कु.एस.एस.उघडे,श्री. डी.जी.घुंगरूड, श्री. पि. डब्ल्यू. कुमरे, श्री.आर.एल.शिंदे, श्री.टी.एम.बरडे,श्री.एस.के.शेलोटे, श्री.एस.डी.बोरकर, श्री.सी.आर कपाट, श्री. पि.आर.खैरे यांनी परिश्रम घेतले.
