
सहसंपादक: रामभाऊ भोयर
विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सारखे पुस्तक प्रेमी व्हावे असे प्रतिपादन प्रा. वसंतराव पुरके, माजी विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केले ते महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय वाढोणा बाजार अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वेडशी येथील ग्रामीण विशेष शिबिराच्या समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले विद्यार्थ्यांना पुस्तकाविषयी प्रचंड आवड असावी कारण पुस्तके हे मनुष्याचे जीवन समृद्ध बनवितात. प्रत्येकाला सुंदर दिसावं वाटतं पण शरीराच्या सुंदरतेपेक्षा गुणत्तेच्या व वर्तनाच्या सुंदरतेला व्यक्तीने महत्त्व द्यावे, हे जगातील सर्वश्रेष्ठ सौंदर्य आहे व ते आपणास पुस्तकातून प्राप्त होऊ शकते. माणूस हा खऱ्या अर्थाने शिक्षणाने मोठा होतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने अविरतपणे विद्या ग्रहण करावी असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती हिराबाई चोपडा सरपंच वेडशी, अंकुशभाऊ मुनेश्वर, सुनीलभाऊ चोपडा, सौ शांताबाई चौधरी सदस्य ग्रामपंचायत, श्री. रमेशभाऊ काटकर अध्यक्ष शाळा समिती, डॉ. शंकर चिव्हाणे, श्री. हरीविजय वानखडे, श्री. बबनराव उताणे, श्री प्रशांत कुसराम, प्राचार्य जितेंद्र शेंडेकर, मुख्याध्यापक श्री राहुल निशाने हे मंचकावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जितेंद्र शेंडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालक कु. हर्षदा राऊत व कु. शिवानी निम्रड यांनी संयुक्तपणे केले तर आभार प्रा. श्यामसुंदर चलाख कार्यक्रम अधिकारी रासेयो यांनी व्यक्त केले. या आठ दिवसीय ग्रामीण विशेष शिबिरात सकाळच्या सत्रात प्राणायम, योगासन व श्रमदान करण्यात आले. दुपारच्या बौद्धिक सत्रात विविध वक्त्यांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये प्रा. रंजय चौधरी यांनी व्यक्तिमत्व विकास, श्री विठ्ठलराव आडे यांनी आजचा विद्यार्थी आणि समाज, प्राचार्य डॉ. संतोष आगरकर यांनी पेयजल- विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक प्रगती, प्रा.प्रभाकर लाकडे यांनी समाज जडणघडणीत समाज सुधारकांचे योगदान आणि श्री. रणजित दांडगे यांनी शेतीवर बोलू काही.. या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच शिबीरात पशु वैद्यकीय शिबिर घेण्यात आले व ग्राम दिंडी काढण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन श्री अंकुश मुनेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले होते.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी श्यामसुंदर चलाख व रासेयो स्वयंसेवकांनी अथक प्रयत्न केले.
