ऑनलाईन सर्वे मध्ये अशोक मेश्राम यांना मतदाराची पसंती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जो सर्वे सत्ताधारी पक्षाकडून सोशल नेटवर्किंग साइटवर टाकण्यात आला त्यामध्ये कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणारे श्री अशोक मारुती मेश्राम यांना सर्वात जास्त 30 टक्के मतदारांनी पसंती दर्शविली आहे, दुसऱ्या क्रमांकावर विद्यमान आमदार श्री डॉ अशोक उईके हे आहे, यावरून निश्चितच कळते की राळेगाव तालुक्यातील मतदारांना नवा चेहरा अपेक्षित आहे, त्यामागे अशोक मारुती मेश्राम यांची मेहनत आहे.अख्खा मतदारसंघ पिंजून काढुन गोरगरीब जनतेची अनेक कामे मार्गी लावली आहे ,ते या मतदारसंघात ठान मांडुन बसले असुन जनतेच्या सुखदुःखात हिरहिरीने भाग घेत आहे, दोन अँब्युलन्स जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहे..
जनतेच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र,निवारा या साध्या सोप्या समस्या येथील जनप्रतिनिधी सोडवू शकले नाही त्यामुळे जनता पुनः पुन्हा रिंगणात उतरणार्या उमेदवाराला संधी देणार नाही असे एकंदरीत चित्र आहे.. चेहरा नवा,हवा हवा हा जनतेचा नारा सर्वत्र ऐकू येतोय.