आधुनिकतेच्या काळात लोप पावत आहेत भुलाबाई.


प्रतिनिधी:प्रवीण जोशी


हल्ली इंटरनेटच्या काळात लहान मुलांच्या हातात मोबाईल काय आला आणि लहान मुलींचा आवडता असा भुलाबाई मांडणीचा व त्यांच्यासमोर निरनिराळे पारंपारिक गीते म्हणणे ही परंपरा लुप्त होत चालले आहे. यानिमित्ताने आई आपल्या मुलीला भविष्यात कोणकोणत्या भूमिका करायच्या आहे असे सुद्धा मुलीला सांगत असेल असे पारंपारिक गाण्यावरून तरी दिसते.
“कारल्याचा वेल लाव ग, सुनबाई मग जा, आपल्या माहेरा” अशी गाणी गायले जातात.
भुलाबाई म्हणजे जगत जननी माता पार्वती आदिशक्ती वसुधे सारखी सर्जनशील, आहे म्हणून ती अंबाबाई वसुधेच्या सृजनशीलतेचा आनंद उत्सव भुलाबाई वसुधा आणि आदिशक्ती पार्वती मातेचा सर्जन उत्सव होय शरद पौर्णिमेच्या रात्री महाराष्ट्राच्या अनेक भागात भुलाबाईची गाणी ऐकायला मिळतात. तसेच या दिवशी भुलाबाईच्या गाण्यानंतर खिरापत वाटण्याची जुनी प्रथा आहे. गणेश विसर्जनाच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा लहान मुलींचा भुलाबाई मांडणीचा सण साजरा केला जातो. भुलाबाई म्हणजेच माहेर वाशीन काही काळाकरिता आपल्या माहेरी येते तिचा हा उत्सव भुलाबाई सोबत भुलोजी म्हणजेच भोळाशंकर आणि लहान असलेला गणराय म्हणजेच गणेश भुलाबाई हा उत्सव विदर्भाचा एक अविभाज्य घटक मानला जातो. व हा अनंत आणि दीर्घकाळ संस्कृतीने जपलेला ठेवा होय. भुलाबाई ही सर्वसामान्य मुलगीच किंवा सासर वाशिन मुलीचे एक प्रतिबिंब आहे भुलाबाई हा कथेतला प्रकार असला तरी मुलीला सासरी कसं वागावं याची शिकवण देते कारण सासर म्हणजे फक्त एक कुटुंब नसते तर एक समाज आहे. व भुलाबाईच्या प्रतिबिंबातील प्रत्येक मुलगी दोन कुटुंबांना एकत्र करून येणारे भावी उत्कृष्ट समाजाचे सृजन करणारा दुवा आहे एवढे नक्की.