
सहसंपादक : रामभाऊ भोयर
स्थानिक आदर्श युवक विकास मंडळ
1988 पासून राळेगाव शहरात क्रिकेट च्या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. यावर्षी नियोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दिनांक 1 जानेवारी 2026 ते 7 जानेवारी 26 पर्यंत RPL-3 चे आयोजन केले आहे.
या स्पर्धेमध्ये राळेगाव, कळंब, बाभुळगाव, तालुक्यातील तसेच रुंझा सर्कल मधील एकूण 14 संघांनी आपला सहभाग घेतला आहे.
क्रिकेट च्या स्पर्धा पारदर्शक व्हाव्यात याकरिता नावाजलेले पंच, समालोचक तसेच देश, विदेशात ही या स्पर्धेचा आनंद क्रिकेट शौकीनांना घेता यावा याकरिता राळेगाव शहरात प्रथमच You Tube लाईव्ह दाखविण्याचं कामही आदर्श मंडळाने केले आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघाना शहरातील, तालुक्यातील मंडळाच्या आसर्यदात्यांनी सुशोभीत अश्या टी शर्ट सुद्धा दिल्या आहे.
या स्पर्धा मंडळाचे अध्यक्ष अरुण सेगेकर, उपाध्यक्ष अशोक भागवत, सचिव फिरोज लाखाणी, धनंजय सेगेकर, प्रदिप ठुणे, युसूफली सैय्यद, राजु झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होतं आहे.
या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी व खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी क्रीडा प्रेमिनी उपस्थित राहावे असे आवाहन आदर्श मंडळाने केले आहे.
