
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हास्तरीय राळेगाव उपविभाग येथे आयोजित उपविभागीय महसूल क्रीडा स्पर्धा दिनांक २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत थ्रो बॉल महिला गटामध्ये केळापूर उपविभाग संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेतेपदाची ट्रॉफी पटकावली.
सदर थ्रो बॉल महिला संघाच्या कॅप्टन माया देवरावजी चेके (येवले), महसूल सहायक, तहसील कार्यालय घाटंजी यांनी सांगितले की, संघाचे यश हे कोच हनुमान क. पेंदोर (माजी सैनिक) तसेच मार्गदर्शक राकेश चावरे, सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे व संघातील सर्व खेळाडूंच्या एकत्रित मेहनतीमुळे शक्य झाले.
केळापूर उपविभाग महिला थ्रो बॉल संघामध्ये उपकॅप्टन पौर्णिमा कनाके, ग्रा. म. अ. प्रमोदिनी खांडरे, ग्रा. म. अ. निरुत्ता चौधरी, म. स. ललिता इनव्हते, म. स. मंजुषा मुन, ग्रा. म. अ. कल्पना पुसनाके, ग्रा. म. अ. नीलम हर्षे, करिष्मा नैताम आदी खेळाडूंचा समावेश होता.विशेष म्हणजे, सेमी फायनल सामन्यात राळेगाव उपविभाग व केळापूर उपविभाग यांच्यात अत्यंत चुरशीचा ‘कट टू कट’ सामना झाला, ज्यामध्ये केळापूर उपविभाग संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत बाजी मारली व अंतिम फेरीत प्रवेश केला.या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी, यवतमाळ तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, केळापूर यांनी केळापूर उपविभाग महिला थ्रो बॉल संघाचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
