आदिम कोलाम समाज विकासापासून कोसो दूर आहे लोकप्रतिनिधी समाजाच्या विकासासाठी कधी प्रयत्न करणारं ?- मधुसूदनजी कोवे सर

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

ग्राम स्वराज्य महामंच ची ग्राम संवाद यात्रा गावा गावात पोहचवुन लोकांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहे आज “शामादादा कोलाम पुण्यतिथी ” कार्यक्रम “घेऊन कोलाम समाजातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत.शामादादा कोलाम पुण्यतिथी निमित्त ग्राम संवाद यात्रा” आज मा.मधुसुदनजी कोवे सर अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा अशोकराव कारमोरे, प्रल्हादभाऊ काळे गुरुजी, नितीनभाऊ ठाकरे ,वसंतराव अर्जुने सहभागी झाले होते मडकोणा ते चापर्डा पोड गोपाल नगर पारधी बेडा रावेरी पिंपळखुटी सोयटी वरुड सराटी बोराटी येथे विदर्भातील राबिनहुड शामादादा कोलाम यांची पुण्यतिथी साजरी केलीपुण्यतिथी निमित्त ग्राम संवाद चर्चा करण्यासाठी गावकरी सांगतात गावच्या समस्या १)बोराटी येथील वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती ला अजून ही पैसे बॅंक पैसे देण्यास तयार नाही
२) घरकुल योजना बांधकाम करताना स्वच्छता गृह/संडास बांधून घेतले परंतु अजून ही लाभ लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही
३) आदिम कोलाम समाज विदर्भातील क्रांतिवीर शामा दादा कोलाम यांची जयंती पुण्यतिथी ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनी साजरी केली पाहिजे
आदिम कोलाम समाज विकासापासून वंचित आहे म्हणून लोक प्रतिनिधी नी आदिम कोलाम समाजाच्या उत्थानासाठी लोक प्रतिनिधी नी पुढाकार घेतला पाहिजे ते कधी घेणारं आहे असा सवाल मा मधुसूदनजी कोवे सर अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी “ग्राम संवाद यात्रा “च्या माध्यमातून केला आहे
गावा गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून लोकांना ऐकून घेणं आवश्यक आहे या ग्राम संवाद यात्रा मध्ये सहभागी रामकृष्णराव वाठोडे, नंदाताई वाटोळे रामदासजी खडकी, बंडुजी मसराम, वसंतजी अर्जुने, रमेशभाऊ खन्नी, दत्ताभाऊ मरस्कोले, रामदासजी पेंदोर ,रेखाताई अर्जुने, कविताताई जुमनाके, अनिलराव पंधरे, ईशु माळवे गावा गावातील कोलाम बांधव उपस्थित होते