स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गोंडवाना गणतंत्र पार्टी ने गावा गावात जाऊन घेतली कॉर्नर सभा लोकांनी मांडल्या समस्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागात वरध,सावरखेडा,लोनी सराटी बंदर,पळसकुंड या गावात जाऊन प्रत्यक्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना कॉर्नर सभा घेतली असता गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या समस्या मांडल्या होत्या आणि राजकीय पुढारी फक्त मतदाना पुरता आमचा वापर करून घेतात आणि नंतर मात्र गावात फिरून सुध्दा पाहत नाही असा रोष गावकऱ्यांनी व्यक्त केला होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पळसकुंड येथे पाणी समस्या बाबत गावात उपोषणाला बसलेले ग्रामस्थ दिसून आले बंदर येथिल रस्त्याची दुरवस्था ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांबध्दल चिड निर्माण केली होती तालुक्यातील कर्तव्यदक्ष पत्रकार मा रामुजी भोयर, विलास साखरकर, देशोन्नती चे पवार आणि खेडेकर यांनी उपोषण स्थळी भेट दिली भर पावसात सावरखेड भेट झाली त्यांनी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे अभिनंदन केले आणि स्वांतत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या आढावा भेटी कार्यक्रमात मा.बळवंतराव मडावी साहेब राज्य कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच रमेश खन्नी विष्णुजी उईके रामकृष्ण आत्राम माजी सरपंच इंदल राठोड संतोष जांभुळकर रामकृष्ण रामगडे विनायक रामगडे जानराव रामपुरे, बबनराव ढोबळे नितीन ठाकरे शंकर कोवे गोवर्धन ढोबळे वसंतराव ऊईके आणि अनेक ग्रामस्थांनी कॉर्नर सभेत सहभाग घेतला होता.