
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्या अर्तंगत येत असलेल्या निधा येथे दिनाक ५ ते ६ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय श्री संत आडकोजी महाराज मंजुळामाता श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व श्री संत गाडगेबाबा यांच्या पावन पुण्यतिथी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले असुन दिनाक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना दुपारी ३ वाजता भंजन रात्री ८ ते १० वाजेपर्यंत सप्तखंजरी वादक ह.भ. प. रोशन पाल महाराज काचंनगाव यांचे किर्तन ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत गावातून दिंडी सोहळा व येणाऱ्या सर्व दिंडीला बक्षीस वितरण १२ वाजता पासून ते ३ वाजेपर्यंत ह. भ. प. प्रमोद देशमुख महाराज यांचे काल्याचे किर्तन व लगेच महाप्रसादाला सुरुवात होईल तरी सर्व समस्त भाविक भक्ततांनी या कार्यक्रमाध्ये सहभागी व्हावे असे आव्हान निधा ग्रामवासीयांन कडुन करण्यात आले आहे.
