
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव सह्याद्री उद्योग समूह या महाराष्ट्रातील नामांकित उद्योग समूहाकडून दिल्या जाणारा राज्यकर्ता पुरस्कार 2021- 22 साठी राळेगाव पंचायत समितीचे सभापती प्रशांत भाऊ तायडे पिंपळखुंटी यांची निवड करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत सदर पुरस्कार हा खासदार संजय राऊत जयंत पाटील जलसंपदा मंत्री; बाळासाहेब थोरात महसूल मंत्री; पंकजा मुंडे पालवे माजी मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमन पॉइंट मंत्रालयासमोर मुंबई येथे 30 जानेवारी 2022 ला दुपारी तीन वाजता वितरित करण्यात येणार आहे सभापती प्रशांत तायडे यांच्या पंचायत समिती व सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याने पंचायत समिती सर्व सभासद गण, कर्मचारी व राळेगाव तालुक्यातून सर्व स्थळावरून आनंद व्यक्त करण्यात येत आहे .
