शेतकरी कष्टकरी जनतेचा सन्मान करणारा राजा शिवछत्रपती -मनिष काळे यांचे प्रतिपादन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

शिवरायांच्या राज्यात शेतकरी, कष्ट्करी माणसाला सन्मान होता. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या पानालाही धक्का लागता कामा नये अशी सक्त ताकीद सैन्याला देणारे लोकहितकारक राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवरायांची लढाई ही धार्मिक कधीच नव्हती तो राजकीय लढा होता. स्वराज्यात सर्वांना समान अधिकार असले पाहिजे ही भूमिका घेऊन शिवराय पुढे गेलें. आणि रयतेचे राजे झाले असे प्रतिपादन मनिष काळे यांनी केले. शिवजयंती निमित्त आयोजित गुजरी येथील प्रबोधन पर्वातील अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. मॅझिनी बायदानी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. हनुमान सभागृह गुजरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
13 फेब्रुवारी ला घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत विजेते
वयोगट वर्ग ४ ते ७
प्रथम विजेते :- कुमारी पूर्वा विवेक गोंडे
द्वितीय विजेते :- अभिजित आनंदराव कटवले
तृतीय विजेते:- कु जानवी सोन्नर
कार्यक्रमाचे संचालक:- प्राध्यापक निलेश गोंडे
कार्यक्रमाचे मार्गदर्शक :- निलेश पेंढे ग्रामस्थ गुजरी
मंगेश गोंडे, सुमित गोंडे,मंगेश कारमोरे,अखिल धांडे, अमोल गंडे
पुढे बोलतांना त्यांनी विविध दाखले देतं शिवरायाचा खरा इतिहास कथन केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिष काळे यांनी गुजरी येथील युवकांनी एकत्र येतं शिवजयंती कार्यक्रम घेण्याचे त्यातही लहानशा गावात प्रबोधन पर्व आयोजित करनाऱ्या युवकांचे कौतुक केले. शिवरायांनी मावळे एकत्र केले तेव्हा संख्या कमीच होती मात्र लढवय्ये पाईक जुळत गेलें आणि स्वराज्य आकारास आले. तेव्हा एकत्र येणे महत्वाचे आहे असे अध्यक्षीय मनोगतातुन विचार मांडले. गुजरी येथील शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने तीन दिवस विविध उपक्रम राबविण्यात आले. सामान्यज्ञान स्पर्धा घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते यातील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शुभम मोगरे, शुभम राऊत,अक्षय डेरे,समीर जुमनाके, आकाश उघडे,अमन गोंडे,अभिषेख गोंडे ,तुषार गोंडे,नितेश ढोकने,गौरव राऊत,गौरव कटवले,सक्षम डेरे, जतीन राऊत,सौरभ झाडे,आकाश फाले,निश्चय सावरकर, ओम इंगोले,शुभम सावरकर ,करण इंगोले, विक्रम भोंग ,भूषण खेडेकार,प्रतीक खेडेकार, युवराज भोंग,आशिष लोंढे,सुमित पेंढे,गौरव झाडे,वैभव शिरपूरकर,रोशन गंडे,अंकित लांजेवार,मिलन वाघाडे,अनिकेत नगराळे,अतुल नेहारे, मोहीत कन्नके, वृषभ लोंढे, अभिजित दाभेकर यांचा सहभाग लाभला.