
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
घराशेजारच्या रस्त्यावर अतिक्रमण करून मानसिक त्रास देणाऱ्या दोघांवर कारवाई साठी वडकी येथील मीरा डांगे तसेच अन्नपूर्णा डांगे यांनी दि 22,10,201 रोजी सायंकाळी 4 वाजता पासून ग्रामपंचायत कार्यालय वडकी येथे उपोषण सुरू केले आहे,
घरासमोरील वडिलोपार्जित रस्ता बंद करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्या या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यांच्याच दबावातून घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्येचा प्रयत्नही केला. या संदर्भात ग्रामपचायतीला तक्रार देऊनही काहीच झाले नाही.
वडकी येथील तुळशीराम डांगेंचे वडिलोपार्जित घर आहे, त्यांच्या घरापासून रहदारीचा एकच रस्ता आहे. परंतु या रस्त्यावर राजू भगत तसेच अमोल भगत यांनी अतिक्रमणकरून भिंत बांधली. याविषयी वडकी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली. परंतु त्यांनी अद्याप कारवाई केली नाही.त्यामुळे हे उपोषण सुरू केले आहे आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ विद्याताई लाड यांनी उपोषण कर्त्याच्या संमश्या जाणून घेतल्या व मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहून तुम्हाला न्याय देईल व न्याय न मिळाल्यास मी 50 महिला सोबत आणून ग्रामपंचयत वडकी येथे आंदोलन करेल असे ह्यावेळी उपोषण कर्त्यांना धीर दिला ह्यावेळी गावातील अनेक नागरिक महिला उपस्थित होते.
