
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
काल दि २५-०७-२०२२ रोजी ग्रा.पं.करंजी ( सो ) ता.राळेगाव जि.यवतमाळ येथील गरजूंना झालेल्या अतिवृष्टी मुळे ज्यांचे संसार उघड्यावर आले कोणताही पर्याय त्यांच्या कडे आपल्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी उरला नाही व पूरामुळे घरांचे/गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या ग्रामस्थांना शासन मदत तहशिल कार्यालय राळेगाव मार्फत एकूण १७ कुटुंबाला प्रती कुटुंब ५००० रू मदतीचे चेक वाटप करण्यात आले, यावेळी सरपंच प्रसाद भाऊ ठाकरे, तलाठी सिडाम मॅडम, ग्रामसेवक येंगडे साहेब, पोलीस पाटील संध्याताई वाभिटकर व समस्त ग्रा.पं.सदस्य ,ग्रामपंचायत कर्मचारी,गावातील प्रतष्ठित नागरिक तथा गावकरी उपस्थित होते.
