
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक ३/०१/२०२२रोज सोमवारला शालेय परिसरात सावित्रीबाई फुले जयंती( बालिका दिन) म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक विलासजी निमरड सर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व प्रथम मान्यवर स्थानापन्न झाल्यानंतर पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरवात केली.त्यानंतर मान्यवर मंडळीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . त्यानंतर वर्ग १२ वी च्या वर्गशिक्षिका सौ कुंदा काळे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेषा मांडली,त्यानंतर वर्ग ११ वी ची विद्यार्थीनी कु तन्वी धुत व कु आरती चांदेकर यांनी मी सावित्री बोलते ही कविता सादर केली त्यानंतर वर्ग १२ वी ची कु नयन भोयर हिने आपले मत व्यक्त केले त्यानंतर कु हिमानी ठोबंरे व प्रिया संगेवार वर्ग ८ वा यांनी गीत सादर केले.त्यानंतर कु कल्याणी वकील वर्ग १० वा कु हंसिका वैद्य वर्ग ८वा ब कु सोनिया चव्हाण वर्ग ९ वा ब कु आचल कुबडे वर्ग ८ वा ब कु कृतिका खडसे वर्ग ९ वा ब यांनी सावित्रीच्या जिवनावर प्रकाश टाकला. सोबतच कु आरती चांदेकर,कु सोनिया चव्हाण व कु कल्याणी वकील यांनी सावित्रीच्या पोशाखात परिसरात आल्याने कार्यक्रमाला चांगलाच बहर आला.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा सहाय्यक शिक्षक मोहन बोरकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्धल सखोल असे मार्गदर्शन केले ते म्हणाले की ” शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आणि ते पिणारा मनुष्य गुरगुरल्या शिवाय राहणार नाही ” असे बोलून आपले मार्गदर्शिय भाषण आटोपते घेतले. कार्यक्रमाचे शेवटी। कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे प्राचार्य विलासजी निमरड सर यांनी अध्यक्षिय भाषणातून विद्यार्थाना मार्गदर्शन केले.ते विद्यार्थ्याना म्हणाले की आपण सावित्रीबाई फुले यांचा एक गुण जरी अंगिकारला तरी जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल.या कार्यक्रमाला पाहूणे म्हणून जेष्ठ शिक्षक रमेश टेंभेंकर सर उपस्थित होते. या कार्यक्रमाला श्रावनसिंग वडते सर दिगांबर,बातुलवार सर , मोहनआत्राम सर, रंजयचौधरी सर, कु वैशाली सातारकर मँडम,मेश्राम सर,तिजारे मँडम, ए बातुलवार सर, तसेच बाबुलाल येसंबरे व विनोद शेलवटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन सौ वंदना वाढोणकर मँडम यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल मस्के सर यांंनी केले.
