रासेयोद्वारा रानभाजी महोत्सव व पर्यावरण पूरक राखी प्रदर्शनी

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोग्यम धनसंपदाय” रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एस. व्ही. आगरकर व कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉ. एस. डी. दावडा यांनी केले.
या रानभाजी महोत्सवात रानभाजी, रानमेवा, औषधी इत्यादी प्रकारच्या रानभाज्यांची प्रदर्शनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली. पावसाळा सुरु झाला की शेतात, रानवनात अनेक रानभाज्या उगवतात. पूर्वजांना या सर्व रानभाज्या माहिती होत्या. त्यांची भाजी कशी बनवायची यांच्या पद्धती माहिती होत्या आताच्या पिढीला या भाज्यांची ओळखही नाही व त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा माहिती नाही. या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्यांमध्ये खनिजे, महत्वाची मूलद्रव्ये व औषधी गुणधर्म असतात त्यामुळे आरोग्य समृद्ध आणि सुदृढ राहण्यारिता त्या आवर्जून खाल्या पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रक्षाबंधनाच्या काळामध्ये अनेकदा प्लास्टिकच्या किंवा पर्यावरणाला घातक अशा राख्या बाजारात उपलब्ध असतात. या राख्या दिसायला आकर्षक मात्र या राख्यांमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी होते. रक्ताच्या नात्याबरोबर पर्यावरण सोबतच्या नात्याला देखील जपणं आवश्यक आहे. म्हणून पर्यावरण ‘पूरक राखी प्रदर्शनी’ महाविद्यालात आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयातील गणित विभागाचे मा. डॉ. ए. वाय. शेख यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आकर्षक अशा पर्यावरण पूरक राख्या बनवल्या. सुत, लोकर पासून फुल, पान, दोरा यांपासून ही राखी तयार करण्यात आली. ज्याने पर्यावरणाला कुठलीही हानी होणार नाही.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील गोरे रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. रुनाली कुमरे, रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल लिहितकर, वनस्पती शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. विवेक समर्थ, प्रा. निलेश देशमुख व प्रा. मोहनीश वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व महाविद्यालयीन प्राध्यापक, रासेयो स्वयंसेवक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.