भरधाव ट्रॅक्टर ने मोटारसायकल स्वारास दिली धडक-दोन जण जखमी अंतरगाव येथील घटना


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव येथील शिवम रामभाऊ वगारहंडे वय 17 वर्ष हा आपल्या मामा सोबत मोटरसायकल क्र एम एच 29 बिके 6174 नि अंतरगाव झोपडपट्टी कडे जात असताना यात समोरून येत असलेल्या ट्रक्टर क्र एम एच 32 पी 1542 या ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगाणे व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल स्वारास धडक दिली या धडकेत शिवम वगारहंडे यांचे मामाला ला जबर मार लागून ते गंभीररित्या जखमी झाले.याप्रकरणी शिवम वगारहंडे यांनी दि 16 जुलै रोजी राळेगाव पोलीस स्टेशन गाठून ट्रक्टर चालकाविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती आज दि 17 जुलै रोजी पोलीस स्टेशन राळेगाव कडून प्राप्त झाली आहे.या घटनेचा पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे