
‘








स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आँगस्ट २०२२या
सप्ताहात ग्रामस्थ, शिक्षक व कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागाने ‘हर घर तिरंगा’ विविध उपक्रम व स्पर्धा राबविण्यात आल्या.
ग्रामपातळीवर ‘स्वच्छता मोहिम’, ‘महिला मेळावा’, ‘वृक्षारोपण, किशोरी मेळावा, रांगोळी स्पर्धा, अर्थ साक्षरता विषयक शिबीर, मोबाईल दुष्परिणाम मार्गदर्शक चर्चा, वार्ड सभा, ग्राम सभा, बाल पंगत, पर्यावरण संवर्धन, अंगणवाडीच्या 30 विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप, ‘ देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, सांस्कृतीक कार्यक्रम इत्यादी उपक्रम यशस्वी होण्याकरिता ग्रामसेवक वडूळे मॅम व उईके मँम शिक्षिका यांनी उत्स्फूर्तपणे प्रबोधन व मार्गदर्शकाच्या भूमिकेत उपस्थिती दर्शविली तसेच अंगणवाडी सेविका मनिषा काटेकर, आशा वर्कर अर्चना उगेमुगे, शिक्षण तज्ज्ञ गणेश येट्टी व डाटा एन्ट्री ऑपरेटर मंगेश येणोरकर यांचे प्रत्येक कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
शाळा पातळीवर ‘क्षण एक स्वच्छतेचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, स्लोगण स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा भाषणस्पर्धा, देशभक्तीपर गीत स्पर्धा, ध्वज प्रतिकृती बनविणे स्पर्धा इत्यादी स्पर्धा राबवून राष्ट्रभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला.१५ऑगस्ट २०२२ ला शाळास्तरावर प्रश्नमंजुषा व भाषण स्पर्धा
घेण्यात आली यावेळी पोलीस पाटील श्रीकांत वटाणे, सरपंच चंदाताई पोटूरकर, उपसरपंच प्रभाकर दांडेकर, सदस्य- चंदुभाऊ उगेगुगे, मालु कोटनाके, सुनिता कुळसंगे प्रतिष्ठित नागरिक सिद्धार्थ नगराळे, अनिल बुरघाटे, प्रमोद राऊत, अमोल गुडधे, अनंता सोनटक्के, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष-श्री मोरेश्वर वटाणे, उपाध्यक्ष धनराज भटकर, ग्रामसेवक वडुळे मॅम, तलाठी भोयर मँम ,शिक्षणतज्ज्ञ गणेश येट्टी, डाटा एन्ट्री ऑपरेटर मंगेश येनोरकर उपस्थित होते.
प्रश्नमंजुषा स्पर्धा1) राजगुरू गट (2) भगतसिंग गट (3) सुखदेव गट या तीन गटामध्ये सहाय्यक शिक्षक श्री. सुनील मेश्राम सर यांनी छान उत्कृष्ट पद्धतीने ३८ प्रश्नांची ६ फे-यांमध्ये स्पर्धा घेतली. विद्यार्थ्यांच्या त्यांच्या भावविश्वातले प्रश्न विचारण्यात आले. उदा (१) राष्ट्रीय मिठाई कोणती आहे ?(जिलेबी)
(2) राष्ट्रीय पदार्थ कोणता आहे? (खिचडी) स्पर्धेचे गुणलेखक चंदाताई पोटुरकर व प्रभाकर दांडेकर यानी केले तर वेळाधिकारी चंदुभाऊ उगेमुगे व श्रीकांत वटाणे होते. शाळास्तरावरील सर्वच विजेत्या स्पर्धकांना प्रजासत्ताक दिनाला बक्षीस वितरण होईल व उपविजेत्या स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल असे सर्वानुमते ठरले. गटप्रमुख अर्पित प्रभाकर दांडेकर, उपगटप्रमुख संजीवनी भास्कर जांभूळकर व ज्ञानेश चंद्रशेखर उगेमुगे हा भगतसिंग गट एकूण १२ गुणांनी विजयी झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक येनोरकर सर यांनी केले. सुत्रसंचालन शिंदे मॅडमनी केले तर आभार प्रदर्शन उईके मॅडम यांनी केले. तद् वतच उईके मॅडम यांनी डिजिटल शाळेविषयी सर्वांसमोर प्रस्ताव मांडला. सतत दोन वर्ष स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी शिक्षक व लोकसहभागातून शाळा डिजिटल करू या असा सतत पाठपुरावा करत असतांना आज अमृतमहोत्सव निमित्त ग्रामपंचायत निधीतून दोन लाख रुपये देऊन शाळा डिजिटल करण्याचे ठरले? ग्रामपंचायत सचिव वडुळे मॅम व सरपंच पाेटुरकर ताई ,उपसरपंच प्रभाकर दांडेकर, सदस्य चंदुभाऊ उगेमुगे यांनी ग्रामपंचायतला इस्टीमेट व शिक्षण समितीचा ठराव द्या असे चर्चेअंती सांगितले. याबद्दल सर्वांच्यावतीने धन्यवाद मानले.
खाऊ वाटप व चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दि. १७ ऑगस्ट २०२२ला ठीक ११.०० वाजता सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले यावेळी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी हजर होत2ते.त्याचप्रमाणे
सरपंच व उपसरपंच ,ग्रामसेवक,ग्रामस्थ,परिचारिका,आशा गटप्रवर्तक व कर्मचारी हजर होते.
“स्वातंत्याचा अमृत महोत्सव२०२२” अशाप्रकारे सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाने समारोप करण्यात आला.
