बबनराव दुरबुडे यांचे दुःख द निधन

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगांव ता २२ (तालुका प्रतिनिधी) माता नगर येथील प्रतिष्ठित नागरिक बबनराव दुरबुडे ( ७९ ) यांचे २२ फेब्रुवारी २०२२ दुपारी 3.30 वाजता दुःखद निधन झाले . दि २२ फेब्रुवारी ला सकाळी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना राळेगांव येथील स्थानीक डॉक्टरांना उपचाराकरीता दाखविण्यात आले त्यांनी यवतमाळ ला रेफर केले दत्त हॉस्पीटल यवतमाळ येथे त्यांच्यावर उपचार सुरु होते परंतु डॉक्टरांच्या उपचाराला फारसा प्रतिसाद न दिल्याने त्यांची ३.३० प्राणज्योत मालवली . त्यांना हार्ट अटॅक चा तिव्र झटका आल्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . त्यांच्या मागे पन्ती मंदाबाई मुलगा संजय राजेंद्र मुलगी सौ सारीका व मोठा आप्त परीवार आहे . त्यांच्या जाण्याने दुःखाचे सावट पसरले आहे .