श्री लखाजी महाराज विद्यालयाने पुरप्रस्तांना मदत करून दाखविला माणुसकीचा धर्म,104 परिवाराला ब्लॅंकेटचे केले वाटप


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे राळेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक लोकांची दैनिय अवस्था झाली असून अनेक शेतकरी बांधवांच्या घरात पुराचे पाणी शिरले असून अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली असून बऱ्याच शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून या घाबरलेल्या शेतकऱ्यांना काही सुचेनासे झाले असताना झाडगाव येथील नाल्याजवळील जवळपास 150 कुटुंब पाण्यात येऊन त्या परिवाराच्या जिवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, हातरूण, पांघरूण, वापरायचे कपडे असे बरेचसे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर श्री लखाजी महाराज विद्यालयाच्या कर्मचारी बंधू भगिनींनी विद्यालयात ताबडतोब बैठक घेऊन आपण सुद्धा या परिवाराच्या दुःखात सहभागी झालो पाहिजे यासाठी आपण सर्वोपरी फुल नाही तर फुलांची पाकळी मदत करण्याचा चंग बांधून दिंनाक 21/7/2022 रोज गुरूवारला झाडगाव येथील चौकातील टिळक स्मारक तथा श्री लखाजी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे उपस्थित 104परिवाराला ब्लॅंकेट वाटप करून मानुसकीचा धर्म दाखविला.या समाजपयोगी कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव कोल्हे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे हे उपस्थित होते. सोबतच मंचकावर झाडगावचे सरपंच बाबाराव किन्नाके, उपसरपंच तथा संस्थेचे सचिव रोशन कोल्हे, प्रदीप देशपांडे सर, उल्हास देशपांडे, भालचंद्र केवटे,शरद केवटे, अशोक केवटे,सारंगधर गावंडे सर,नारायण पवार,रूपेश रेंघे यांच्या हस्ते पुरग्रस्ताना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर,रमेश टेंभेकर सर,श्रावनसिंग वडते सर,दिगांबर बातुलवार सर, राजेश भोयर सर,मोहन आत्राम सर,मोहन बोरकर सर, विशाल मस्के सर,रंजय चौधरी सर,सौ.कुंदा काळे मॅडम,सौ.वंदना वाढोणकर मॅडम,सौ.स्वाती नैताम मॅडम,कु.वैशाली सातारकर मॅडम,तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वाल्मिक कोल्हे,पवन गिरी,शुभम मेश्राम, बाबूलाल येसंबरे, विनोद शेलवटे यांनी अथक परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य विलास निमरड सर यांनी केले.तर सुत्रसंचलन मोहन बोरकर सर यांनी केले तर आभार रमेश टेंभेकर सर यांनी केले.हा मदतीच्या हाताचा श्री लखाजी महाराज विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या उपक्रमाची जनमानसात वाहवा होत असून गावकऱ्यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे.