जागतिक आदिवासी दिनी बिरसा प्रतिज्ञा बंधन बिरसा ब्रिगेडचे बिरसाईत बांधणार,,– डॉ.अरविंद कुळमेथे


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225)


राळेगाव येथील बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे साक्षीने बिरसा मुंडा चौक राळेगाव येथे ९आगाष्ट२०२२ जागतिक आदिवासी दिनी ठिक सकाळी १० वाजता यवतमाळ जिल्ह्यतील बिरसा ब्रिगेड चे सर्व पदाधिकारी, सर्व बिरसाईत सैनिक राळेगाव येथे हजार राहून बिरसाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना बिरासाईत सैनिकांना देश स्वातंत्र्यासाठी दिलेली प्रतिज्ञा बिरसा ब्रिगेड मध्ये सामील झालेले सर्व पदाधिकारी व बिरसाईत सैनिक आपल्या हाताला पिवळ्या रंगाच्या धाग्याचे बिरसा बंधन बांधून बिरसा ब्रिगेड मध्ये सामील होऊन सामाजिक लढ्याची प्रतिज्ञा घेणार आहे.
तरी सर्व बिरसाईत जनतेने जागतिक आदिवासी दिनी राळेगाव येथे बीरसा मुंडा पुतळ्या जवळ ठीक १० वाजता हजार राहवे, व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये व व गाव गावातील शाखेमध्ये सर्व बिरसा ब्रिगेडच्या सैनिकांना बिरसा बंधन बांधून बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक लढ्याची प्रतिज्ञा देण्यात यावी असे आव्हान बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष डॉ. अरविंद कुळमेथे ,महा.संघटक प्रा.वसंतराव कनाके, विदर्भ प्रमुख पांडुरंग व्यवहारे , जिल्हा उपाध्यक्ष गणेश आत्राम ,सचिव निलेश पंधरे , बिरसा ब्रिगेड एम्पलोईज सेल विदर्भ अध्यक्ष प्रा.विजय चांदेकर, पुसद तालुका अध्यक्ष मारोती भस्मे,राळेगाव विभाग संपर्कप्रमुख सुरज
मरसकोल्हे , जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश मडावी, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख विनोद ऊईके, विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष गौरव पंधरे विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष आशिष मेश्राम, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष विकास उईके, विद्यार्थी तालुका संघटक कळंब सुमित आत्राम, वणी तालुकाप्रमुख सुधाकर चांदेकर , राळेगाव विभाग संघटक दिनेश करपते, तालुकाध्यक्ष महादेवराव मेश्राम, तालुकाध्यक्ष प्रमोद ईरपाते, आर्णी तालुकाध्यक्ष सचिन आत्राम केळापूर तालुका अध्यक्ष अक्षय सिडाम , तालुकाध्यक्ष शेषराव मडावी, घाटंजी उमेश कुळमेथे, यवतमाळ तालुकाध्यक्ष कामेश आगलदरे ,राळेगाव तालुका सचिव नानाभाऊ कनाके, उपाध्यक्ष विठ्ठल कन्नाके, रोशन ऊईके, विद्यार्थी अध्यक्ष समीर
केराम ,शहर प्रमुख पवन टेकाम, विद्यार्थी उपाध्यक्ष सुरज जुमनाके, महिला शहराध्यक्ष लक्ष्मीताई मेश्राम ,संघटक भगवान कोवे, शिवदास मंगाम, अभय कनाके, वैभव टेकाम , कळंब तालुका कार्याध्यक्ष गजानन टेकाम, सचिव महेश सोयाम ,सहसचिव धनराज गेडाम, संघटक गजानन वरकाडे, सहसंघटक सुनील दुर्वे,कोषाध्यक्ष निवृत्ती पंधरे, प्रसिद्धी प्रमुख अमोल येटी ,संपर्कप्रमुख उमेश येरमे, नियोजक सुनील मेश्राम, श्रीराम टेकाम, तुषार गेडाम, सौरभ मेश्राम, शंकर धुर्वे, श्रीराम पेदोर यांनी आव्हान केले आहे. हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात राबवून बिरसाईत जनतेला बिरसा ब्रिगेड मध्ये सामील करून घेण्याचे आव्हान सर्व बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. हाताला पिवळ्या धाग्याचे बिरसा बंधन बांधून प्रतिज्ञा समाप्ती नंतर सभेत रुपांतर होऊन जागतिक आदिवासी दिनाचा संयुक्त राष्ट्राने तयार केलेला जाहीरनामा विषयी मार्गदर्शन होणार आहे.