
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर 9529256225
सध्या तरी पाऊस छान पैकी सर्वदूर पडल्या ने,लावण केलेले बी बियाणे निघण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी खूष आहे.पण या महत्वपूर्ण हंगामात शेतकरी बांधवांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी असलेला कृषी विभाग मात्र कमालीचा उदासीन दिसत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी कायदेशीर बंदी असलेल कपाशी च बी.टी.वाण लावलेले आहआहे.
बेकायदेशीर बी.टी. वाण विक्री करणारे अनेक महाभाग तालुक्यात गेल्या पाच सात वर्षांपासून तालुका कृषी कार्यालय व कृषी कार्यालय पंचायत समिती यांच्या नाकावर टीच्चून खुलेआमपणे सर्रास विक्री करुन रग्गड पैसा कमवित आहे. हे सर्वसामान्य जनतेला दिसतं पण या अवैध व्यवसायीकां सोबत यांचे आर्थिक मधूर सबंध तर नाही ना?असा प्रश्न आता विचारला जातो आहे.
मागील वर्षी अशाच बेकायदेशीर बी.टी.बियाण्यांच्या वाणातून,सर्रास मोठ्या प्रमाणावर बोंडअळी निघाली होती आणि शेतकऱ्यांचे खूप मोठं आर्थिक नुकसान झालं याला जबाबदार राळेगांव तालुक्यातील हे दोन्ही कृषी कार्यालय नाही का?
वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांची सतत ची कृषी केंद्रात उठबस काय दर्शवते?
कृषी सहाय्यक नेमून दिलेल्या गावात जातात का?किती शेतकरी बांधवांच्या बांधावर या हंगामात हजारो रुपये वेतन व इतर सर्व सोयी सुविधा घेणारे गेले होते का?
या हंगामात तर सोडाच इतर ही राज्य,केंद्र सरकारच्या शेतकरी विविध योजनांची माहिती देत नाही,उलट जवळ चा एखादा पकडून या योजनेतून आपला कसा आर्थिक लाभ होईल यात च धन्यता मानतात.
या वर्षी प्रतिबंधीत बियाणे विक्रेत्याला यवतमाळ च्या चमूने धाड टाकून पकडले. हे काम तालुका कृषी कार्यालय व कृषी कार्यालय पंचायत समिती यांचे होते. आजही अव्याहत पणे सुरु आहे.बेकायदेशीर बियाणे विक्री मुळे राळेगांव तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांचे नुकसान,दुकानातील विक्री साठी आणलेल बियाणे तसेच शिल्लक राहिल्याने झालं आहे.
खताचा तुटवडा,अवाजवी किंमत,या सर्व बाबी शेतकऱ्यांच्या नशीबात आहे. याला आळा घालण्यासाठी राळेगांव तालुक्यातील हे दोन्ही विभाग सपेशल अयशस्वी ठरत आहे हे विशेष…
