
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील पिंपरी सावित्री येथे 19 ऑक्टोंबर 2021 ला पिंपरी सावित्री येथे विष प्राशन करून तरुण शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. मनोहर अण्णाजी मिलमिले वय 40 वर्ष यांनी त्याच्यावर असलेल्या बँकेच्या कर्जाला व सतत होत असलेल्या नापिकीमुळे व आता ती दृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे बँकेचे कर्ज कसे भरायची या काळजीमुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी रात्री विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली त्यांच्यामागे पत्नी व दोन मुली अशा आप्त परिवार आहे या घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळताच तात्काळ वडकी पोलीसांनी पिंपरी सावित्री येथे घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह राळेगाव येथे पोस्टमार्टम करिता पाठविण्यात आले आहे.
