
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
जिल्ह्यातील विविध रेती घाटातून अवैध रेती उपसा सुरू आहे. ही चोरीची रेती पवतमाळातील विविध बांधकाम साईडवर टाकली जाते. अनेक चोरट्या मार्गाने शहरात रेती आणली जाते. पासाठी माफियांनी पाळत ठेवणारेही उभे केले आहे. त्यानंतरही तब्बल नऊ वाहनांवर कारवाई करत १३ लाख ५८ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
यवतमाळ शहरात अवैध रेतीसाठे केले जातात. याशिवाय रात्री विविध वाहनातून रेती आणली जाते. रेतीचा अवैध व्यापार फोफावला आहे. यात मोठी कमाई असल्याने तस्कर जुमानण्यास तयार नाही. ज्या घाटांचा लिलाव झाला त्या पाटांचा वाहतूक पासवर रेतीची वाहतूक केली जाते. एकच पास दिवसभर पापरली जाते. त्यानंतर रात्रीही रेतीचा साठा केला जातो. रेतीचा साठा करून दामदुप्पट दरात विकल्या जाते. मुळात महसूल अधिनियमाप्रमाणे सायंकाळी ६ नंतर रेतीघाटावर वाहन लावता येत नाही मात्र माफियांनी जेसीबी व ट्रेशर बोटचा वापर करून उपसा सुरू केला आहे. यातून रेती घाटाचा पर्यावरणीय हास होत आहे.
यवतमाळ शहरात येणारा धामणगाव मार्ग, मोसा मार्ग, आणी मार्ग गोंदणी मार्ग, नागपुर मार्ग येथे महसूल पथक दबा धरून बसले होते. त्यानंतर अवैध रेती घेऊन आलेले एम. एच. २९/टी. ४२९९, एम. एच. २९/बी. डी. ४५६० एम. एच. २९/व्ही. ३२९, एम. एच. ३१/सी. क्यू. ३६३५, एम. एच. ३६/ एफ. १८२० एम. एच. २९/बी.ई. ७०७५, एम. एच. २९/व्ही ६१७४, एम. एच. १९/मेड. ५०३४ एम. एच.२९/ बी.ई. ०९३१ या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली.
