
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्याने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम दिनांक १४/२/२०२२ रोजी सायंकाळी संत सेवालाल महाराजाच्या जिवनावर आधारित वेगवेगळे कार्यक्रम सादर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ फेब्रूवारी संत सेवालाल महाराज जयंती दिनी सकाळ पासून भजन पूजन सुरू करून ठीक दहा वाजता आरती करून पालखीत फोटो ठेवण्यात आला व संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.पालखी सोबत बँंड पथक, घोडा व समाज बांधवाच्या उपस्थितीने गावकऱ्यांना आकर्षीत करून घेतले. समस्त समाज बांधवानी सक्रिय सहभाग नोंदविला होता.पालखी प्रदक्षणा झाल्यानंतर परत मंदीरात आल्यानंतर दहीहांडी करून महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. महाप्रसादाचा सर्व समाज बांधवानी आनंद घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
