
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
जय भीम चा जयघोष व ढोल ताशा च्या निनादात राळेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती दिं १४ एप्रिल २०२२ रोज गुरुवार ला मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असून या मिरवणूक मध्ये निघालेली रॅली आकर्षक ठरली. राळेगाव येथील बौद्ध उपासक उपासिकानी सकाळी ८:०० वाजता पासून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी एकच गर्दी केली त्यानंतर बौद्ध उपासक उपासिका यांनी बुद्धवंदना घेतली व सायंकाळी पाच वाजता पासून आंबेडकर पुतळ्याजवळून मिरवणूकीला सुरवात करण्यात आली ही मिरवणूक शहरातील मुख्य चौकातून काढण्यात आली असून बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी शहरातील चौका चौकात बौद्ध उपासक-उपासिका यांना नाश्त्याचे लिंबू शरबतचे वाटप करण्यात आले असून या मिरवणुकीत शहरातील बौद्ध उपासक उपासकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
यावेळी पुतळा परिसराचे सर्वांग सुंदर सौंदर्यीकरण करणारे शासकीय कंत्राटदार राजाभाऊ दुधपोळे यांचा शाल व श्रीफळ देऊन समिती च्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
