वादळी वाऱ्यामुळे कुकुट पालनचे तीन लाख रुपयांचे नुकसान

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव जवळ असलेल्या रतनापुर शेत शिवारातील गट नंबर ३६ मधील शेतात असलेला सायरा नूर मोहम्मद थेम यांच्या कुकुट पालन शेड वरच्या टिना वादळी वाऱ्यामुळे उडाल्या व शेड मध्ये असलेल्या कोंबडयाचा मृत्यू झाल्याने तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. शेतीला जोड धंदा म्हणून कूकुट पालन व्यवसाय करत होता परंतु अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि शेतकऱ्यांच्या कोंबडयाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. आता सद्या शेतकऱ्याचे पेरणीचे दिवस आहे आदीच शेतकरी पैशाची जुळवा जुळव करत आहे व त्यामध्ये कुकुट पालनचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.त्यामुळे शेतकऱ्याला सरकारकडून आथिर्क मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.