वडकी येथे घरफोडी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी केले सोन्या चांदीचे दागिने लंपास

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

४१ हजार ७० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व नगदी १६०० रुपये चोरून नेले आहेत. चोरीची ही घटना शनिवार दि २३/१०/२०२१ रोजी सकाळच्या सुमारास वडकी येथे उघडकीस आली. याप्रकरणी गणेश तुकाराम राखुंडे यांनी वडकी पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली आहे.गणेश राखुंडे हे मूळचे वडकी येथील रहिवाशी आहेत. येथील वार्ड क्र २ मध्ये दत्त मंदिराकडे ते राहतात.
नेहमीप्रमाणे दि २२/१०/२०२१ रोजी घरातील सर्व सदश्य जेवण वगैरे करून रात्री १० वाजता झोपले असता दरम्यान चोरट्यांनी शुक्रवारचे मध्यरात्री ते शनिवारी पहाटे दरम्यान घराच्या दरवाजाचा कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेली ३ ग्राम सोन्याची अंगठी,३ ग्राम कानातले टॉप्स,१ ग्राम सोन्याची मण्याची पोत,दोन चांदीच्या अंगठ्या,चांदीची चाळ, सोन्याची अंगुठी,सोन्याची जिवती,चांदीची मनगट,रेडमी कँपणीचा मोबाईल,तसेच नगदी १६०० रुपये
असा एकूण ४१ हजार ७० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. पोलिस निरीक्षक विनायक जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोंगाडे सह पोलीस कर्मचारी रमेश मेश्राम,सूरज चिव्हाणे,कुरण दासारवार तपास करीत आहेत. वडकी येथे चोऱ्यांचे सत्र सुरूच…मागील तीन ते चार महिन्यांपूर्वी वडकी येथे असेच किराणा दुकान फोडले होते त्यामुळे चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वडकी येथील लोकांत भीती निर्माण झाली आहे.