
पांदण रस्त्याने अखेर घेतला मोकळा श्वास..
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
नागठाणा येथील वहिवाटीचा पाधंन रस्ता गेल्या वीस वर्षापासून बंद होता बापुराव दसोडे, देवानंद दसोडे, सदानंद दसोडे, प्रमोद भोयर, विनोद भोयर, उमेश भोयर, विजय भोयर, किशोर सोन्नर, प्रभाकर सोन्नर, उज्वल खैरकार, मोरेश्वर खैरकर, संतोष आडे व इतर गावकरी यांच्यासाठी अडचणीचा होता त्यांनी मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सदर प्रकरण दाखल केले होते सदर प्रकरणात मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडील सी आर नंबर १७९६ दिनांक ३०/११/२०२२२ नुसार सुरू होते. या प्रकरणांमध्ये मा. डॉ. रवींद्रकुमार कानडजे तहसीलदार यांनी पुढाकार घेऊन शेतीची मोजणी करण्याचे आदेश देऊन मोजणी करून घेऊन सर्वानुमते चर्चा करून संमतीने वीस वर्षापासून बंद असलेल्या पांदण रस्ता मोकळा करून दिला त्यामुळे सर्व गावकरी यांनी तहसीलदार साहेब राळेगाव यांचे आभार मानले व पांदन रस्ता मोकळा करते वेळी विश्वास वाघ मंडळ अधिकारी
सौरव तुमसकर तलाठी राळेगाव,मोहन सरतापे तलाठी व इतर तलाठी व गावकरी यांनी मदत केली.
