
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नुकतीच प्रा.जितेंद्र जवादे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी प्राचार्य पदी मोहन देशमुख हे होते त्यांनी दोन वर्षे प्राचार्य पदाची धुरा यशस्वी रित्या सांभाळली असून मोहन देशमुख हे शासन नियमानुसार दिं ३१ जून २०२२ रोज बुधवारला सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्ती नंतर प्राचार्य म्हणून दिनांक १ जुलै २०२२ रोज गुरुवार ला प्रा.जितेंद्र जवादे यांची संस्थेतील शासकीय सेवाजेष्ठता नियमानुसार प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रा. जितेंद्र जवादे यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे व सचिव सौं अर्चना धर्मे यांना दिले असून त्यांच्या प्राचार्य पदी नियुक्तीचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
