
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त मा.अमोलजी येडगे साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कल्पनेतून यवतमाळ या आदिवासी बहुल जिल्ह्यामधील मागासवर्गीय कोलाम पोड/पारधी बेडा/तांडावस्ती येते जातीचे प्रमाणपत्र महत्वाचा दस्तऐवज वाटप करण्याच्या योजने करिता मा.शैलेशजी काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव व मा. डॉ. रविंद्रजी कानडजे तहसीलदार राळेगाव यांचे मार्गदर्शनाखाली वरंध मंडळातील खेमकुंड (भुरबा पोड) येते कोलाम समाजाचे जातीचे प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर घेण्यात आले. शिबिरमध्ये एकूण 56 जातीचे प्रमाणपत्र लक्ष्मीमुक्त योजने अंतर्गत पत्नीचे नाव समाविष्ट करणेबाबत 5 खातेदारांना 7/12 वाटप व इतर दाखले वाटप करण्यात आले.
शिबिराकरिता मा. शैलेशजी काळे उपविभागीय अधिकारी राळेगाव, मा. डॉ. रवींद्रजी कानडजे तहसीलदार राळेगाव, श्री. रोहितजी भोरे तांत्रिक अभियंता उपविभागीय कार्यालय राळेगाव व खेमकुंड गावातील गावकरी, विद्यार्थी, विद्यार्थीनी व महिला उपस्थित होत्या.
शिबिराकरिता श्री. ए. एन. कणसे मंडळ अधिकारी वरंध, पौर्णिमा किनाके तलाठी खेमकुंड, राजेंद्र तुमराम तलाठी वरंध, उमेश टेकाम कोतवाल वरंध, दिनेश पेंदोर कोतवाल खैरगाव का. पोलीस पाटील खेमकुंड यांनी विशेष परिश्रम घेतले.
