
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
शिवछत्रपती क्रीडा मंडळ सावरखेड यांच्या तर्फे शिवजयंती निमित्य व स्व.वामनराव बापू इंगोले यांच्या स्मृती प्रित्यर्थ कब्बडी चे प्रेक्षणीय खुले सामने आयोजित करण्यात आले होते,या सामन्याचा अंतिम सामना दि.26 फेब्रुवारी ला आयोजित करण्यात आला होता ,अंतिम सामना वसंत स्पोर्टिंग क्लब वरध विरुद्ध जय बजरंग क्रीडा मंडळ कार्ली या दरम्यान खेळण्यात आला ,या अंतिम सामन्यात कार्ली संघाने वरध संघाला पराभूत करीत विजेतेपद पटकावले .बाल गणेश क्रीडा मंडळ माकोडा संघाने तृतीय बक्षिस ,शिवशाही क्रीडा मंडळ केसलापूर यांनी चतुर्थ बक्षिस पटकावले ,या बक्षीस समारंभाला अरविंद भाऊ फुटाणे ,राजुभाऊ मेश्राम,विजयराव धुळे,पंडरिनाथजी दुर्गे,नानाभाऊ डोफे,रामकृष्णाजी आत्राम,दिलीपभाऊ दुधकोहळे, दिपकभाऊ दुधकोहळे,दादारावभाऊ मोहद उपस्थित होते.या सामन्याच्या यशस्वीतेसाठी शिवछत्रपती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष पुंडलीकजी खंगारे,उपाध्यक्ष सौरव तेलंगे ,पवन उरकुडे,अमोल राऊत,संदीप मेश्राम,सुधाकर मेश्राम,आकाश ढोबळे व सर्व सदस्य गण यांनी सहकार्य केले.
