राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील प्रभाग क्रमांक एक मधील अशोक माणिकराव कुंमरे वय ५० वर्ष या इसमाने दिं १४ जून मंगळवारला सकाळी ९ :३० वाजताच्या दरम्यान आपल्या घरी नायलोनच्या दोरी घराच्या लोखंडी अँगलला गळ फास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की अशोक माणिक कुमरे यांना पत्नी दोन मुले विक्रम २१ वर्ष सौरभ १९ वर्ष व एक मुलगी रिना वय २३ वर्ष असा परिवार असून पत्नी सकाळी मजुरी ला शेतात गेली होती तर दोन्ही मुले मजुरीला गेली होती तर मुलगी ही शेजारच्या घरी गेली होती तेव्हा घरी कोणीच नसल्याचे पाहून अशोक कुमरे यांनी घरी असलेल्या पलंगावर खुर्ची ठेवून लोखंडी अँगलला नाईलोनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली असून अद्याप त्याच्या आत्महत्यांचे कारण कळले नसून पुढील तपास राळेगांव पोलीस करीत आहे.
