अंतरगाव येथे महीला व बालविकास यांच्या सयुंक्त  विद्यमाने पोषण सप्ताह संपन्न

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

      महिला व बालविकास प्रकल्प राळेगाव अंतर्गत अंतरगाव सर्कल मध्ये अंतरंगाव अंगणवाडी केंद्रात महिला व  बालविकास यांच्या सयुंक्त  विद्यमाने पोषण सप्ताह १सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या सप्ताहाचे उद्घाटन अंतरगाव  येथील सरपंच प्रविणभाऊ ऐबंडवार व पोलिस पाटील शिल्पाताई वनकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या पोषण सप्ताहाचे मुख्य उदिष्ट म्हणजे कोणतेही  बालक कुपोषित  राहणार नाही हे आहे. अंतरगाव सर्कलच्या अंगणवाडी सेविका प्रांजलीताई येगडे,मनिषाताई काटेकर,छायाताई दांडेकर, माधुरीताई भगत,वनिताताई कापटे,चित्राताई घिनमिने,अल्काताई पारधी,सिंधुताई तिवाडे,सविताताई येसंबरे, शशिकलाताई फुलमाळी , ऊर्मिलाताई  भोसले,  मायाताई मेश्राम,ज्योतीताई मेश्राम,
सुनंदाताई हिवरे,आदी अंगणवाडी सेविका उपस्थित  होत्या.