
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित व बुद्ध जयंती तसेच कवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंच राळेगाव च्या वतीने १४ मे २०२२ रोज शनिवारला सायंकाळी ६:०० वाजता शिवाजी व्यायाम प्रसारक मंडळ यांचे भव्य पटांगणात बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षी २६ जानेवारी ला संविधान दिनानिमित्य घेण्यात येणारा कार्यक्रम हा कोरोना काळात रद्द करण्यात आला होता कारण कोरोना आजाराने देशभरात थैमान घातले असतांना शासनाने सर्व कार्यक्रमावर निर्बंध घातले होते त्यामुळे दोन वर्ष कार्यक्रम रद्द करण्यात आला होता मात्र आता कोरोना आजार संपुष्टात आला असल्याने शासनाने मागील काही दिवसांपासून कार्यक्रमावरील निर्बध उठवले आहे. म्हणून दरवषी घेण्यात येणारा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३१ व्या जयंतीनिमित्त व बुद्ध जयंती तसेच वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त घेण्यात येत असून या बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे ख्यातनाम प्रबोधनकार सुप्रसिद्ध पार्श्वगायक प्रकाशनाथ पाटणकर आणि त्यांचा संच असणार आहे या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष विठ्ठल लढे हे असणार आहेत. तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तहसीलदार डॉ रवींद्र कानडजे राळेगाव तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक संजय चौबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मुडे, सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अंकुश मुनेश्वर, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा कलावंत श्याम खंडारे, आंबेडकरी विचारवंत यवतमाळ रणधीर खोब्रागडे, गोपीचंद कांबळे आदीच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. तरी या बुद्ध भीम गीतांच्या कार्यक्रमाला तालुक्यातील तथा परिसरातील जनतेनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे इंद्रजित लभाने,बाबाराव नगराळे तसेच सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
