
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टी मुळे गावातील लोकांची वाहून गेलेल्या घराची व शेतकऱ्यांच्या व्यथा जाऊन केली पाहणी, माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांनी आज दुपारी तीन वाजता तालुक्यातील झाडगाव येथे भेट दिली यावेळी नंदिनी नदीच्या प्रवाहाने उध्वस्त झालेल्या अभिमान बोभाटे सुभाष खडसे लखू लटारे यांच्या शेताची पाहणी करून शेतकऱ्यांची विचारपूस केली तसेच गावातून येणाऱ्या नंदिनी नदीच्या किनाऱ्यावर झाडगाव गावानजीक गावात पाणी पोहोचवू नये म्हणून संरक्षण भिंत उभारण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी ग्रामस्थांना दिले खरडून गेलेल्या शेतीची पाहणी करून शासनाला योग्य त्या सूचना दिल्या जाईल असेही याप्रसंगी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी माजी आमदार राजीव तोडसाम माजी शालेय शिक्षण मंत्री वसंत पुरके नानाभाऊ गाडबैल राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सरचिटणीस क्रांती धोटे (राऊत)कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल मानकर मनीष पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळू धुमाळ, शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, प्रसाद ठाकरे, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसीलदार डॉ रवींद्र कुमार कानडेजे, विनायक जाधव ठाणेदार वडकी , ठाणेदार संजय चौबे, यांची उपस्थिती होती स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेऊन अजित पवार यांनी झाडगाव चा दौरा आटोपता घेतला राळेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्तांना सरसकट मदत मिळवून दया या आशयाचे विरोधीपक्ष नेते ना. अजितदादा पवार यांचे कडे राष्ट्रवादी काँगेस पक्षांची मागणी केली
राळेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना आज राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. अजितदादा पवार यांनी भेट दिली. यांचे सह विविध घटकांनी मागण्याचे निवेदन दिले. सरसकट नुकसान भरपाई मिळावी या करीता पाठपुरावा करावा या स्वरूपाची मागणी अनेकांनी केली.
