तहसीलदार येणार असल्याच्या धास्तीने अवैध रेती तस्करांची दाणादाण

रेती वाहतूक करण्याची रॉयल्टी असल्यावर भिती कशाची ?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

    

🔸रेती वाहतूक

    

राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरात तहसीलदार येताच रेती तस्करांची दाणादाण सविस्तर वृत्त असे सध्या स्थितीत हीरापुर, कोसारा, आपटी हा रेती लिलाव झाला आहे. या घाटावरून मोठ्या प्रमाणात टिंपर,ट्रक, ट्रक्टर रात्र दिवस रेतीची वाहतूक करत आहे.मात्र ज्या घाटायचा लिलाव व्हायचा आहे त्या घाटावरून तर मोठ्या प्रमाणात वाळुची रात्र दिवस तस्करी होतांना दिसत आहे पुर्वी तर रात्री रेती तस्करी व्हायची आता तर पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान रेती तस्करीचा खेळ सुरू असल्याचे चित्र येवती, धानोरा, मोदापुर, चहांद, परसोडा, रिधोरा, विहिरगाव,खैरगाव, सावरखेडा या परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी करून अव्वाच्या सव्वा भावाने या परिसरात ग्राहकांना दिली जात आहे. सदर हीरापुर, कोसारा, आपटी या घाटावरून मोठ्या प्रमाणात ट्रक, टिंपर रात्र दिवस राळेगाव तालुक्यातील इतर ठिकाणी जात आहे एकाच रॉयल्टीवर अनेक फेऱ्या ट्रक्टर,टिंपर, ट्रक मारत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश टिंपर, ट्रक्टर,ट्रक मध्ये नियमा पेक्षा जास्त वाळू असते हीरापुर, कोसारा, आपटी या घाटावरून रात्र दिवस रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. सदर लिलाव घाटावरून रात्री रेती वाहतूक करण्यासाठी ट्रक, टिंपर, ट्रक्टर यांना रॉयल्टी दिली जातात का ? जर यांना रात्री रेती वाहतूक करण्यासाठी रॉयल्टी दिली जातात तर यांना भिती कशाची? राळेगाव तहसीलदार यांची गाडी या परिसरात येताच वडकी कडून राळेगाव कडे जाणारे ३ ते ४ रेती ट्रक रिधोरा गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील सर्वोदय विध्यालय जवळ अंदाजे ७ ते ८ घंटे थांबून महसूल विभागाचे अधिकारी या परिसरातून परत जाण्याची वाट पहात होते. यावरून असे लक्षात येते की एकाच रॉयल्टी वरुन रात्र दिवस रेतीची वाहतूक होत आहे. चोर नाही तर भिती कशाची ? असा प्रश्न रिधोरा परिसरात होतांना दिसत आहे