
राळेगाव तालुक्यातील येवती येथे दिनांक १०/५/२०२१ रोजी RTPCR कोविड चाचणी घेण्यात आली.त्या चाचणीमध्ये आरोग्य विभागाने १३९ लोकांची तपासणी करण्यात आली. गावात दिवसेंदिवस वाढत असलेल्या आजारामुळे भविष्याची खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले होते.या शिबिरा त्यामध्ये सुद्धा १३९ लोकांची चाचणी करण्यात आली होती. अशा पद्धतीने पार पडलेल्या शिबीरासाठी येवती डॉक्टर निखिल ठाकरे, MPW धनुस्कर, आरोग्यसेविका संध्या इखार , सचिव दिपक चिचाटे, छाया गणेश दरुडे,येवती (धानोरा) तलाठी सुधीर राठोड, सरपंच श्रीराम सोयाम, उपसरपंच आशिष पारधी, सदस्य..उमेश पोहधरे, संजय कुबडे, गावकरी राम कुरटकर, पंकज गावंडे, वासुदेव वानखेडे, दिलीप काळे, राजू ठाकरे, हनुमान बोबडे व इतर गावकऱ्यांनीय अथक परिश्रम घेतले. अशा पद्धतीने शिबीराचे आयोजन केल्यामुळे गावकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
