
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
1)मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित एकविसाव्या वर्षातील राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद व राज्यस्तरीय गुणिजन पुरस्कार वितरण सोहळा 29 डिसेंबर 2021 ला माटुंगा, मुंबई येथे पार पडला.
2) मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी गेली एकवीस वर्षापासून ‘ पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ‘ हे ब्रीद वाक्य घेऊन काम करत आहे.
3) वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरस्काराचे 25 गट वाटले गेले होते, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील विशेष लोकांनाच हा पुरस्कार प्रदान झालेला आहे.
4) आकर्षक सन्मानचिन्ह, लक्षवेधी गौरवपदक, विशेष महावस्त्र, खास मानपत्र, मानकरी बॅच, मानाचा फेटा देऊन साहिल दरणे चा झाला सत्कार.
5) श्री शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर
सुप्रसिद्ध किर्तनकार तथा थोर तत्वचिंतक
यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला
6) साहिल वयाच्या तेविसाव्या वर्षात तब्बल चौथ्यांदा राज्यस्तरीय पुरस्काराचा मानकरी ठरला.
— न्यू गाईज युवा मंच मारेगाव द्वारा आयोजित राज्यस्तरीय प्रज्वलन वक्तृत्व आणि काव्य या दोन्ही स्पर्धेत प्रथम, प्रथम क्रमांक पटकावले 2016
— मदत संघटना नागपूर द्वारा राज्यस्तरीय लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समाज वैभव पुरस्कार मिळवला 2018
— राज्यस्तरीय आदर्श युवा कलारत्न पुरस्कार, मुंबई 2021
— साहिल दरणे हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध निवेदक, वक्ता, बिजनेस कन्सल्टंट सुद्धा आहे,
