आ. समीरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते काजी वार्ड येथील समाजमंदिराचे लोकार्पण.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

            

संविधान दिनाचे औचित्य साधुन स्थानिक काजी वार्ड येथे आमदार समिरभाऊ कुणावार यांचे शुभहस्ते समाजभवनाचे लोकार्पण काल दि.२६ रोजी संपन्न झाले.
काजी वार्ड परिसरातील नागरिकांची समाजमंदिर भवनाची बऱ्याच दिवसांपासून समाज भवन वास्तु निर्मितीची मागणी होती,आमदार कुणावार यांनी या लोकाभिमुख मागणीची दखल घेऊन आमदार निधितुन या समाज भवन वास्तुची निर्मिती केल्याने परिसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त करीत आमदार कुणावार यांचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आभार मानले.
उपरोक्त कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक शुभांगी डोंगरे,अमन काळे,नगरपालिका अभियंता तळवेकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते,यावेळी सामाजिक कार्यकर्ते नानू एंकेश्वर,सुनिल डोंगरे,अमोल खंदार, महादेव डोंगरे तसेच परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत डोंगरे यांनी केले तर प्रस्ताविक अशोक मेश्राम यांनी केले,कार्यक्रमाचे समारोपानंतर कु.काजल डोंगरे हिने उपस्थितांचे आभार मानले.