वर्धा जिल्हातील हिंगणघाट येथे धक्कादायक प्रकार..! लॉकडाउन नें घेतला भंगार व्यावसायिक युवकाचा बळी.!

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे

मागील दीड वर्षांपासून कोरोनाची स्थिती देशभरात निर्माण झाली असून सरकार अपयशी ठरल्याचे दिसून येते, त्यामुळे फक्त आणि फक्त लॉक डाऊन जनतेवर थोपवून सरकार कुठलेही नियोजन न करता पुन्हा लाडावून थोपवीत आहे, आणि या लॉक डाऊन मुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले.,होता नव्हता जवळचा पैसा लॉक डाऊन मुळे संपला आणि आता जगायचं कसं व लोकांकडून कर्ज घेऊन आतापर्यंत जीवनात तडजोड केली पण आता सरकारने पुन्हा लॉक डाऊन थोपवून सर्वसामान्य जनतेला उपाशी मरण्यास वाऱ्यावर सोडून दिलं. त्यामुळे असे अनेक प्रकार घडताना आपल्याला दिसून येत आहे, कोरोना ने नंतर मरतील पण lockdown जीव घेत आहे.
संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट मध्ये राहणारे प्रवीण अशोक नगराळे, भंगार व्यवसायी यांनी सतत च्या लॉक डाऊन मुळे त्रस्त होऊन आत्महत्या केली. या तरुणाच्या आत्महत्येला जबाबदार कोण?
असेच जर कुठलाही पूर्वनियोजन न करता जनतेवर लॉकडाऊन थोपविले तर सर्वसामान्य जनतेला सामूहिक आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून त्वरित यावर उपयोजना करून निर्णय घ्यावा.!
आणि पीडित परिवाराला आर्थिक सहयोग करावा.!